>

पृष्ठ

रायगड जिल्हा परिषद शाळा धोंडसे आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

Thursday, 24 September 2015

शालेय बचत बँक व शालेय वस्तू भांडार

शालेय बचत बँक  
          विद्यार्थ्यांना पालक खाऊसाठी काही पैसे देत असतात किंवा काही भागात विद्यार्थी शाळा सुटल्यावर काही कामे करतात . उदा . कापूस वेचणी ,बोर वेचणी,इ . तसेच कोणी पाहुणे मंडळी आल्यास तेही मुलांना थोडेसे पैसे देतात .असे पैसे आपण जर विद्यार्थ्यांची बँक बनवून त्यात ठेवले तर मुलांना योग्य वेळी ते पैसे करता येतील . शालेय साहित्य खरेदी करता येईल . त्यासठी स्वतंत्र रजिष्टर करून त्यात मुलांची खाती काढता येतील . शक्य झाल्यास त्यांना पासबुक ची पण व्यवस्था करता येईल. व्यक्तिपरत्वे या उपक्रमात बदल करता येईल. व मुलांना बचतीची सवय तसेच बँकेचे कामकाज समजावून देता येईल . त्या पैशातून शाळेत शालेय उपयोगी वस्तू ठेऊन त्याना खरेदी विक्री समजावून सांगितले जाते-
शालेय वस्तू भांडार
           आपल्या शाळेतील मुलांसाठी वही ,पेन , पेन्सील ,कंपासपेटीतील साहित्य ,खोडरबर साहित्य आपण विकत आणून ठेवू शकतो .टे साहित्य मुलांना माफक दरात म्हणजे न नफा न तोटा या तत्वावर विकत देवू शकतो . या उपक्रमात मुलेच नियंत्रण ठेवतील त्याचा जमा खर्च मुलेच पाहतील .

No comments:

Tricks and Tips