>

पृष्ठ

रायगड जिल्हा परिषद शाळा धोंडसे आपले सहर्ष स्वागत करीत आहे.

Saturday, 19 September 2015

माझ्या शाळेतील उपक्रम

शालेय बचत बँक व शालेय वस्तू भांडार

विद्यार्थी बँक

विद्यार्थ्यांना पालक खाऊसाठी काही पैसे देत असतात किंवा काही भागात विद्यार्थी शाळा सुटल्यावर काही कामे करतात . उदा . कापूस वेचणी ,बोर वेचणी,इ . तसेच कोणी पाहुणे मंडळी आल्यास तेही मुलांना थोडेसे पैसे देतात .
असे पैसे आपण जर विद्यार्थ्यांची बँक बनवून त्यात ठेवले तर मुलांना योग्य वेळी ते पैसे करता येतील . शालेय साहित्य खरेदी करता येईल . त्यासठी स्वतंत्र रजिष्टर करून त्यात मुलांची खाती काढता येतील . शक्य झाल्यास त्यांना पासबुक ची पण व्यवस्था करता येईल. व्यक्तिपरत्वे या उपक्रमात बदल करता येईल. व मुलांना बचतीची सवय तसेच बँकेचे कामकाज समजावून देता येईल . त्या पैशातून शाळेत शालेय उपयोगी वस्तू ठेऊन त्याना खरेदी विक्री समजावून सांगितले जाते-

गृहपाठ तपासणी गट

आपण विध्यार्थ्यांना नेहमी गृहपाठ देत असतो. दुसऱ्या दिवशी सर्वांचा गृहपाठ तपासणे शाळा मोठी असल्यास अवघड जाते. आणि जर आपण दररोज गृहपाठ नाही तपासला तर काही विध्यार्थी गृहपाठ पूर्ण करणार नाहीत.
त्यासाठी आपण आपला वेळ वाचवा आणि गृहपाठ ही तपासला जावा यासाठी वर्गातील काहीमुलांचे गट तयार करून त्यांच्यावर जबाबदारी देऊन  शाळा भरण्यापूर्वी गृहपाठ तपासण्याचे काम पूर्ण करू शकतात.
यामुळे आपला वेळ वाचतो आणि गृहपाठ तपासण्याचे कामही पूर्ण होते.
धूळपाटी
मुलांनामातीत किंवा वाळूत खेळायला फार आवडते त्यामुळे आपण एका ट्रे मध्ये बारीकवाळू किंवा माती भरून मुलांना बोटाने अंक किंवा अक्षरे गिरवायचा सराव घेऊ शकतो.
यामुळे मुलांना आनंद तर मिळेलच पण त्यातून आपला शिकवण्याचा उद्देश ही साध्य होईल.

वैयक्तिक स्वच्छता

विद्यार्थ्यांना आपण नेहमी स्वच्छतेचे महत्व पटउन देत असतो. वेळोवेळी नखे कापणे , केस कापणे , दात घासणे , नियमित आंघोळ करणे
हात स्वच्छ धुणे अशा सूचना वारंवार द्याव्यात. आठवड्यातून एक दिवस ठरवून आपण १००% सर्व विद्यार्थ्याची स्वच्छतेची तपासणी परिपाठ
झाल्यावर करू शकतो.
त्यामुळे विध्यार्थी साहजिकच स्वच्छ राहण्याचा प्रयत्न करतील. तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या लहान भावंडांची स्वच्छतेविषयी काळजी
घेण्यास प्रवृत करावे.

इंटरनेट / संगणक शिक्षण

लोक वर्गणीतून किंवा काही सामाजिक संस्थेमार्फत आपण शाळेला संगणक मिळऊ शकतो किंवा काही ठिकाणी शासनाने शाळांना संगणक पुरवले आहेत. असे संगणक शाळेत धूळ खात पडून ठेवन्यापेक्षा त्याचे शिक्षण मुलांना देऊ शकतो. बाजारातून नेत सेटर किंवा मोडेम घेऊन त्यावर इंटरनेट चालउन आपण त्याचेही शिक्षण मुलांना देऊ शकतो. म्हणजे आपली मुले जगाच्या बरोबर चालतील. मुलांना दररोज संगणक हाताळण्यासाठी देणे.

कवायत व योगासने

शरीर ही आपली खरी संपत्ती आहे.
हे आपणाला माहित आहे.
त्यामुळे निरोगी शरीर राहणे फार महत्त्वाचे असते.
त्यासाठी आपण नेहमी योगासने घ्यावीत.
दर शनिवारी आपण हा उपक्रम घेऊ शकतो.
सकाळी सकाळी रनिंग , व्यायाम  व योगासने घ्यावीत.
तसेच मुलांना घरीही योगासने करायला प्रेरित करावे.
तसेच कवायत ही आपण नेहमी घ्यावी.
त्यामुळे मुलांना आरोग्य तर लाभेलच पण त्यांना स्वयंशिस्त लागण्यास मदत होईल.

गावातील व्यावसायिकांना भेट

आपल्या गावात किंवा शेजारच्या गावात जर काही व्यवसाईक असतात.
उदा. कुंभार , टेलर , झाडू बनवणारे , लोहार इ. अश्या ठिकाणी जावून आपण मुलांना त्या वस्तू कश्या बनवतात यांची माहिती देऊ शकतो.त्यामुळे ते त्यांच्या दीर्घकाळ स्मरणात राहते.

वाचाल तर वाचाल
वाचनाचे महत्त्व आपणाला माहित आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी समजपूर्वक वाचन करणे फार महत्वाचे असते. वाचनासाठी भरपूर प्रमाणात आपल्याकडे साहित्य उपलब्द असते. वाचन सुधारण्यासाठी भरपूर सरावाची आवश्यकता असते. त्यामुळे दररोज शाळा सुटण्यापूर्वी १० मिनिटे वाचनाचा सराव घ्यावा. वाचण्यासाठी नेहमी वेगवेगळे उतारे द्यावेत. त्यानंतर आपण लगेच त्यावर आधारित प्रश्न विचारावेत.त्यामुळे मुले काळजीपूर्वक वाचन करतील.
शैक्षणिक सहल
वर्षातून एकदा किंवा दोन वर्षातून एकदा आपण शैक्षणिक सहलीचे आयोजन करू शकतो. किल्ले बघणे , लेणी बघणे , थंड हवेची ठिकाणे किंवा प्रेक्षनिय स्थळे ई. ठिकाणी आपण सहलीचे आयोजन करू शकतो. लहान शाळा असल्यास जवळपासच्या ठिकाणी आपण सहल नेहु शकतो.
शैक्षणिक सहल मुळे मुलांच्या निरिक्षन शक्तीला वाव मिळेल. तसेच नवनवीन गोष्टी त्यांना पाहायला मिळतील.

शालेय वस्तू भांडार

आपल्या शाळेतील मुलांसाठी वही ,पेन , पेन्सील ,कंपासपेटीतील साहित्य ,खोडरबर साहित्य आपण विकत आणून ठेवू शकतो .टे साहित्य मुलांना माफक दरात म्हणजे न नफा न तोटा या तत्वावर विकत देवू शकतो . या उपक्रमात मुलेच नियंत्रण ठेवतील त्याचा जमा खर्च मुलेच पाहतील .
याच फायदा असा होईल की मुलांना अल्प दरात शालेय साहित्य मिळेल . व व्यापार कसा करावा याचेही ज्ञान मिळेल .
स्वतःची उपस्थिती स्वतः लावणे
हा उपक्रम घेताना दररोज परिपाठ झाल्यावर सर्व मुलांनि आपल्या नावाची पट्टी घेऊन स्वतः लावणे यामुळे त्यांना नावाची लवकर ओळख होईल 
सुंदर हस्ताक्षर स्पर्धा

आपणाला माहित आहे एखाद्याच्या सहीवरून किंवा त्याच्या अक्षरावरून आपण तो व्यक्ती कसा असेल याचा अंदाज लाऊ शकतो. विद्यार्थ्यांचे अक्षर हे आपल्या अक्षराचे प्रतिबिंब असते. त्यासाठी आपण विद्यार्थ्यांच्या अक्षरावर जाणीवपूर्वक लक्ष द्यावे. आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी वारंवार सुंदर हस्ताक्षर स्पर्धा आयोजित कराव्यात.
जेणेकरून विद्यार्थी आपले अक्षर वळणदार व मोत्यासारखे काढण्याचा प्रयत्न करतील.

डिजिटल स्कूल:
माहिती आणि संचार तंत्रज्ञानाच्या साह्याने अध्ययन, अध्यापन, व्यवस्थापन व समन्वयातून शिक्षणाचा दर्जा उंचावायचा प्रयत्न करावा. पाठ्यपुस्तकातील धडे व कवितांचा आशय समजून घेतल्यानंतर अनिमेशनच्या तंत्रामुळे विद्यार्थी दृकश्राव्य अनुभवही घेतात. अनिमेटेड फिल्म्स, मनोरंजक उपक्रम स्वाध्याय, चाचण्या, खेळ यांच्या मदतीने शिकतांना विद्यार्थ्यांना निरनिराळ्या विषयांची गोडी लागते.

 इंटरनेटच्या मदतीने शिक्षण: 

शाळेतील विद्यार्थी विविध संकेत स्थळांना भेटी देऊन माहिती घेतात. टिपणी काढतात त्यामुळे अध्ययन-अध्यापन प्रक्रिया प्रभावी होते. इंटरनेटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे माहिती तंत्रज्ञानाने निर्माण केलेल्या माहितीच्या महाजालाशी नाते निर्माण होते.

उपक्रमचे नाव - सोप्या सोप्या पद्धतीने इंग्रजी वाक्य तयार करणे.
सदर उपक्रमामध्ये दरोरज विद्यार्थांना १०० इंग्रजी वाक्याचे लेखन करणे.
उदा .१  I eat a mango. मुलांना कर्मात बदल करावयास सांगावा.
फक्त आपण आबांच खातो का ? नाही. banana, apple, chocolate, ice cream, bread. एका क्रीयापादावरून मुले 10 वाक्य सहज लिहू शकतील.
उदा .२ I see the TV. फक्त आपण TV च पाहतोका ? नाही.
sun, tree, table, village,moon, book  या क्रीयापादावरून मुले सहज 10 वाक्य लिहू शकतात.
याचप्रमाणे मुलांना दरोरज 10 क्रियापद शिकवल्यास मुले १०० वाक्य तयार करू शकतील व त्यांच्या मनातील इंग्रजी विषयाची भीती दूर होईल. एका आठवड्यात मुले ६०० ते ७०० वाक्य लिहितील. यामुळे मुलांना इंग्रजी निबंध, गोष्टी, पत्र, भाषण संभाषण करणे सोपे जाईल. 

नाव – श्री. दत्तात्रय प्रल्हाद खोंडे शाळा – नेनावली

No comments:

Tricks and Tips